टेलिग्रामने आणले जबरदस्त अपडेट; तब्बल एक हजार जण एकाच वेळी बोलू शकतील


सध्याच्या टेलिग्राम या इंस्टंट मेसेजिंग अॅपची लोकप्रियता वाढत असून जगभरात सध्या टेलिग्रामचे 500 दशलक्षाहून अधिक युझर्स आहेत. यापैकी 300 दशलक्ष युझर्स गेल्या तीन वर्षात टेलिग्रामशी जोडले गेले आहेत. टेलिग्रामकडून वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर युझर्संना अधिकाधिक फीचर्स देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून विद्यमान युझर्स टेलिग्रामवर राहतील, तसेच नवीन युझर्स देखील जोडले जातील.

टेलिग्रामने नुकतेच त्याच्या युझर्ससाठी व्हिडीओ कॉलचा एक नवा अफलातून फिचर आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी तब्बल एक हजार लोकांशी एकाचवेळी जोडले जाऊ शकता. टेलिग्रामवर सिंगल व्हिडिओ कॉल तसेच ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतात. टेलिग्रामवर यापूर्वी ग्रुप व्हिडिओ कॉलची मर्यादा फक्त 30 लोकांची होती. म्हणजेच एका वेळी फक्त 30 लोक व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकत होते. पण टेलिग्रामच्या नव्या अपडेटमुळे युझर्संना एक नवीन आणि भन्नाट फिचर प्रदान केले आहे.

आता टेलिग्रामची व्हिडिओ कॉल मर्यादा या नवीन फीचरच्या मदतीने 30 लोकांकडून 1000 लोकांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आता तब्बल 1000 लोक टेलिग्रामच्या व्हिडिओ कॉलचा भाग बनू शकतील.

काय आहे टेलिग्रामचे हे नवीन फिचर ?
टेलिग्रामच्या या नव्या टेलिग्राम ग्रुप व्हिडिओ कॉल 2.0. या फिचरद्वारे, 1000 लोक आता कोणत्याही ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकतील. यामध्ये, 30 वापरकर्ते त्यांच्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ प्रसारित आणि स्क्रीन शेअर करू शकतील आणि इतर सर्व वापरकर्ते त्या व्हिडिओ कॉलचा एक भाग बनून प्रसारण पाहू शकतील.

जगभरातील शिक्षण व्यवस्था कोरोना महामारीमुळे प्रभावित झाली आहे. शाळा बंद झाल्या आणि ऑनलाईन क्लासेसचा ट्रेंड सुरू झाला. अशा परिस्थितीत, या नवीन वैशिष्ट्याच्या मदतीने, 1000 पर्यंत विद्यार्थी ऑनलाइन वर्गांचा भाग बनू शकतात. शिक्षकांना 30-30 विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट तयार करून वर्ग घेण्याची गरज भासणार नाही, जेणेकरून अभ्यास कमी वेळेत व्यवस्थित करता येईल.

वर्क फ्रॉम होम करणारे लोक ऑनलाईन मीटिंगद्वारे टेलिग्रामच्या या नवीन फिचरद्वारे एकाच वेळी 1000 लोकांबरोबर कामाशी संबंधित माहिती मिळवू शकतील.

टेलिग्रामच्या या नवीन फिचरद्वारे, कंपनी एका वेळी त्याच्या 1000 उत्पादनांना त्याच्या कोणत्याही नवीन उत्पादनांची माहिती प्रसारित करण्यास सक्षम असेल. यामुळे विपणन प्रक्रिया सुलभ होईल आणि अधिक लोकांना कमी वेळेत उत्पादनाविषयी आवश्यक माहिती मिळेल.