टपाल खात्यात 10 आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी विविध पदांसाठी भरती


मुंबई : भारतीय टपाल खात्यात 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी विविध पदांसाठी भरती केली जात आहे. विशेष म्हणजे ही नोकरीची सुवर्णसंधी कोणत्याही परीक्षेशिवाय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. टपाल खात्याने पंजाब पोस्टल सर्कलसाठी ही भरती आहे. यानुसार पोस्टल असिस्टेंट, सॉर्टिंग असिस्टेंट, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ?

इच्छुक उमेदवार या भरतीसंदर्भातील अधिक माहिती या लिंकवर जाऊन जाणून घेऊ शकतात. या पदासांठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 18 ऑगस्ट आहे. विशेष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

इच्छुक तरुण तरुणी या लिंकद्वारे अधिक सविस्तर जाणून घेऊ शकतात. एकूण 57 रिक्त जागांसाठी ही पदभरती असणार आहे. तसेच शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा, असे आवाहन संबंधित विभागाद्वारे करण्यात आले आहे. अनेकदा काही इच्छूक उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज करतात. त्यामुळे वेबसाईटवर लोड येतो. परिणामी अर्ज भरता येत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागू नये, म्हणून हे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

  • पोस्टल असिस्टेंट – 45 पद
  • सॉर्टिंग असिस्टेंट – 9 पद
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 3 जागा

नोकर भरतीसाठी अशा आहेत अटी ?
पोस्टल असिस्टेंट या सॉर्टिंग असिस्टेंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराने सर्टिफाईड बेसिक कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा. तसेच मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा तरुण हा किमान 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष असावा. तसेच उमेदवाराला संबंधित राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषेचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा

  • पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट – 18 ते 27 वर्ष
  • मल्टी टास्किंग असिस्टेंट – 18 ते 25 वर्ष

वेतन श्रेणी

  • पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट पदासाठी 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये.
  • मल्टी टास्किंग असिस्टेंट पदासाठी 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.