कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी हनी सिंहच्या पत्नीने भरपाई म्हणून मागितली एवढी रक्कम!


बॉलिवूडमध्ये सिंहर आणि रॅपर हनी सिंहचे नाव खुपच प्रसिद्ध आहे. पण कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप हनीवर त्याच्याच पत्नीने लावले आहेत. तसेच हनी सिंहसोबतच त्याचे आईवडील आणि लहान बहिणीविरोधात दिल्ली तीज हजारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मानसिक, आर्थिक छळ केल्याचा आरोप करत भरपाईमध्ये मोठी रक्कम मागितली आहे.

हनी सिंहच्या पत्नीने लग्नाच्या अनेक वर्षांनंतर आपले मौन सोडत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. हनी सिंहचा सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या गायकांमध्ये समावेश होतो. मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंह तब्बल 173 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. दरवर्षी जवळजवळ 42 कोटी रुपयांची कमाई हनी सिंह करतो. त्याच्या पत्नीने याचिकेमध्ये म्हटले आहे, की तो आपल्या प्रत्येक शोमधून कोट्यावधी रुपये कमावतो.

मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंहजवळ, 25 मिलियन डॉलर संपत्ती आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये 173 कोटींची ही संपत्ती आहे. हनी सिंहजवळ देशात विविध ठिकाणी बंगले आहेत. त्यांची किंमतसुद्धा कोटीमध्ये आहे. एक गाणे गाण्यासाठी हनी सिंह 15 लाखांची रक्कम घेतो. तो देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या लोकांमधील एक आहे. त्याला महागड्या गाड्यांची खुपच आवड आहे. त्याच्याजवळ BMW, ऑडी आर 8, ऑडी क्यू 7,जॅगुआर, रोल्स रॉयस अशा अनेक गाड्या आहेत.

न्यायालयात 160 पानांची याचिका हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारने सादर केली आहे. हनी सिंह आणि त्याच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. तसेच तिने भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली आहे.

शालिनीने म्हटले आहे, की ती दिल्लीच्या ज्या घरात राहते त्याचे भाडे तब्बल 5 लाख रुपये आहे. तिने न्यायालयात विंनती केली आहे, की हनी सिंहने ही रक्कम द्यावी. त्याचबरोबर तिने आपल्या दागिन्यांची एक मोठी यादी दिली आहे. तसेच तिने अंतर्गत भरपाई म्हणून 10 करोड रुपयांची मागणी केली आहे. शालिनीने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत हनी सिंहला जबाब नोंदवण्याची नोटीस दिली आहे.