एमजी अॅस्टॉर एसयूव्ही जिओ सहकार्याने बनणार शानदार कार

आपल्या ग्राहकांना कनेक्टेड कार तंत्रज्ञानाचा परिपूर्ण अनुभव देण्यासाठी एमजी मोटर्सने रिलायंस जिओ बरोबर हातमिळवणी केली आहे. लवकरच कंपनी त्यांच्या आगामी एमजी अॅस्टॉर एसयुव्ही पेट्रोल मध्ये जिओ कनेक्टीव्हिटी सुविधा देणार आहे. जिओच्या सहकार्याने, एमजी कार कनेक्टेड इंटरनेट सोल्युशन अधिक उत्तम प्रकारे ग्राहकांसमोर सादर करणार आहे. फुल्ली कनेक्टेड स्वरुपात ही एसयूव्ही बाजारात येणार आहे.

या तंत्रज्ञानाचा फायदा असा की त्यामुळे कारच्या आतच इंटरनेट सह कॉलिंग साठी नेटवर्क सुविधा मिळणार आहे. सेफ्टी फिचर्स बरोबरच ड्रायविंगचा अधिक चांगला अनुभव चालक घेऊ शकतील असा कंपनीचा दावा आहे. एमजी मोटर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले ऑटो क्षेत्रात चांगले तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनवर भर दिला जात आहे. याच प्रयत्नातून आम्ही जिओच्या सहकार्याने पूर्ण कनेक्टेड कार ग्राहकांना उपलब्ध करत आहोत.

रिलायंस जिओचे संचालक व अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले, जिओ आयओटी व स्ट्रीमिंग सोल्यूशनच्या मदतीने युजर्सना रिअल टाईम कनेक्टीव्हिटी सह इन्फोटेनमेंट व टेलीमॅट्रिक्सचा लाभ मिळेल.

एमजी अॅस्टॉर एसयुव्हीच्या फिचर्स मध्ये १०.१ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनॉरॉमिक सनरुफ, १.५ लिटर, चार सिलिंडर नॅचरली एस्पायरेटेड इंजिन आणि सिक्स स्पीड मॅन्यूअल व ऑटो गिअर बॉक्स यांचा समावेश आहे.