संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून स्वातंत्र्य दिनी आमंत्रित करणार पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या सर्वांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 120 पेक्षा जास्त खेळाडूंसह 228 लोकांची तुकडी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पंतप्रधान मोदी नियमितपणे संघाला प्रोत्साहन देतात आणि अनेक खेळाडूंशी संवाद साधतात.