मायक्रोमॅक्स इन टूबी – ‘ नो हँग फोन’

मायक्रोमॅक्स कंपनीची ओळख कमी बजेट मध्ये टच स्क्रीन स्मार्टफोन देणारी कंपनी अशी आहे. हीच ओळख कायम ठेवताना मायक्रोमॅक्सने मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन टूबी या नावाने सादर केला आहे. मायक्रोमॅक्स वन बी नंतरचा हा लेटेस्ट फोन आहे. कंपनीने या फोनचे सर्वात मोठे फिचर ‘नो हँग फोन’ हेच असल्याचा दावा केला असून फोन हँग होण्यामुळे युजरला येणाऱ्या अडचणी या फोन मध्ये येणार नाहीत असे म्हटले आहे.

या फोनला ६.२ इंची आयपीएस एलसीडी स्क्रीन दिला असून हा ड्युअल सीम फोन आहे. त्याला अँड्राईड ११ ओएस, ५ हजार एमएएचची नॉन रीमुव्हेबल बॅटरी १० डब्यू चार्जिंग सह दिली गेली आहे. हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये असून ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजची किंमत ७९९९ तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत ८९९९ रुपये आहे.

फोनला १३ एमपी आणि २ एमपीचा ड्युअल रिअर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून काळा, निळा आणि हिरवा अश्या तीन रंगात फोन उपलब्ध आहे. याची खरेदी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर ६ ऑगस्ट पासून करता येणार आहे.