किंग खानच्या महिला हॉकी टीमला आगळ्या शुभेच्छा

ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला हॉकी टीमने प्रथमच सेमी फायनल मध्ये प्रवेश केल्यामुळे महिला हॉकी इतिहासात ऐतिहासिक विजयाची नोंद झाली आहे. यावेळी बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने हॉकी प्रशिक्षक सोर्ड मार्जेन यांच्या ट्विटला उत्तर देताना महिला खेळाडूंना आगळ्या शुभेच्छा दिल्या असून किंग खानचे हे रीट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.

चक दे इंडिया या हॉकीवर आधारलेल्या एका अप्रतिम चित्रपटात शाहरुखने हॉकी प्रशिक्षक कबीरखान ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट आणि शाहरुखची भूमिका खुपच गाजली होती. त्याचा संदर्भ शाहरुखने दिला आहे. महिला हॉकी टीमचे प्रशिक्षक सोर्ज यांनी केलेल्या ट्विटर ला रिट्विट करताना शाहरुख म्हणतो, ‘हांहां, नो प्रॉब्लेम, जस्ट ब्रिंग सम गोल्ड फोर बिलियन्स इंडिअन फॅमिली.( परत येताना आपल्या अब्जावधीच्या कुटुंबाकरता थोडे सोने घेऊन या) यंदा धनतेरस २ नोव्हेंबरला आहे. – एक्स कोच कबीरखान ‘

सोर्डेन यांनी सुद्धा शाहरुखच्या ट्विटला उत्तर देताना त्याला सपोर्ट आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. ते म्हणतात, ‘तुम्हाला सर्वकाही देणार. खऱ्या कोचकडून.’ हा सामना भारतीय महिला हॉकी टीमने ऑस्ट्रेलियाला ३-१ असे नमवून जिंकला आहे.