ऑगस्ट महिन्यात साजरे होतात हे अजब डेज

आजकाल कोणत्याही कारणाने जगात विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. अश्या ‘डेज’ ची संख्या १५०० हून अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा विविध अजब कारणांनी असे अनेक दिवस साजरे होतात. यातले बरेचसे डेज आपल्याला माहिती सुद्धा नाहीत. अनेकांनी त्या बद्दल ऐकलेले सुद्धा नाही. त्याबद्दल ही मनोरंजक माहिती.

ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. यंदा १ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला गेला. १ ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल गर्लफ्रेंड डे’ म्हणून सुद्धा साजरा केला जातो. १८६३ साली प्रथम हा शब्द वापरला गेला तो एक महिला दुसऱ्या महिलेची मैत्रीण आहे हे सांगण्यासाठी. आता मात्र याचा अर्थ पुरुषाची मैत्रीण असा घेतला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे त्या महिलेला, तू माझ्यासाठी स्पेशल आहेस आणि मी तुझा सन्मान करतो’ या भावना व्यक्त करण्याचा उद्देश असतो.

२ ऑगस्ट हा दिवस आईस्क्रीम सँडविच डे म्हणून साजरा होतो तर ३ ऑगस्टला वॉटरमेलन म्हणजे कलिंगड दिवस साजरा होतो. ५ ऑगस्ट ह दिवस ‘वर्क लाईक अ डॉग डे’ म्हणून साजरा केला जातो.

१० ऑगस्ट हा दिवस युएस मध्ये ‘राष्ट्रीय आळशी दिवस’ म्हणून साजरा होतो. आळशी लोकांचा सन्मान म्हणून या दिवशी अनौपचारिक सुट्टी दिली जाते. १२ ऑगस्ट हा दिवस मिडल चाईल्ड म्हणजे मधले भावंड दिवस आहे तर १६ ऑगस्ट हा दिवस अमेरिकेत ‘ राष्ट्रीय टेल अ जोक डे’ म्हणून साजरा होतो.

२२ ऑगस्ट हा दिवस’ बी अॅन एन्जल डे’ म्हणजे देवदूत बना म्हणून साजरा होतो तर २३ ऑगस्ट रोजी ‘ राईड लाईक अ विंड’ म्हणजे वाऱ्यासारखे धावा दिवस असतो. २५ ऑगस्ट रोजी ‘किस अँड मेकअप डे’ साजरा होतो तर ३१ ऑगस्ट हा दिवस’ ईट आउटसाईड’ म्हणजे मराठी भाषेत ‘घराबाहेर हादडा’ दिवस म्हणून पाळला जातो.