जानव्हीला हवेय अगदी साधे लग्न

बॉलीवूड मध्ये अल्पावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठलेली श्रीदेवी कन्या जान्हवी कपूर हिने बॅचलर ते सात फेरे यासाठीचा प्लान तयार केला आहे. लाखो करोडो चाहत्यांच्या दिलाची धडकन बनलेली जान्हवी, तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात काय घडते आहे ते कळावे यासाठी चाहते सतत उत्सुक असतात. त्यात जान्हवीने तिच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा पिकॉक या मासिकाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

जान्हवीने आत्तापर्यंत चार चित्रपट केले असून आगामी काळात ती अनेक चित्रपटात दिसणार आहे. पण प्रोफेशनल आयुष्याबरोबरच जान्हवी तिच्या खासगी आयुष्यावर सुद्धा विचार करते आहे. लग्नाविषयी बोलताना ती म्हणते, लग्न अगदी साधे हवे. फार तर दोन किंवा तीन दिवसाचा कार्यक्रम. तिला बॅचलर्स पार्टी काप्री येथे करायची आहे. मेहंदी, संगीत कार्यक्रम आई श्रीदेवीचे माहेरघर असलेल्या मयलापूरच्या घरी म्हणजे आजोळी करायचा आहे. आणि लग्न मात्र तिरुपती मंदिरात करायचे आहे.

रिसेप्शन बाबत तिला फारशी उत्सुकता नाही. रिसेप्शनची गरजच तिला वाटत नाही. विवाहांसाठी अगदी साधे पण पारंपारिक डेकोरेशन तिला हवे आहे. त्यात मोगरा आणि मेणबत्त्या हव्यात. खुशी, अन्शुला आणि खास मैत्रीण तनिशा तिला करवल्या म्हणून हव्या आहेत असेही जान्हवी सांगते.