काल दिवसभरात 41 हजार 831 कोरोनाबाधितांची नोंद, तर 541 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 41 हजार 831 नव्या रुग्णांची भर पडली असून 541 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 24 हजार 351 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 39 हजार 258 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. ही ताजी आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आता देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 8 लाख 20 हजार 521 झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.