या आहेत जगातील सर्वात धोकादायक जागा


हे जग जेवढे सुंदर आहे, तेवढेच भयानक देखील आहे. साधारणता सर्वच जण सुरक्षित जागेवर राहण्याचा अथवा जाण्याचा विचार करतात. मात्र जगात अशा काही जागा आहेत जेथे जाणे देखील धोकादायक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जेथे जाणे आणि श्वास घेणे देखील धोकादायक आहे.

हे आहे जापानचे ‘मृत्यूचे डबके’. ही जागा येथील सर्वात प्रसिध्द ठिकाणांपैकी एक आहे. या डबक्यात पोहण्यास बंदी आहे. याचे तापमान 194 डिग्री फारेनाइट म्हणजेच 90 डिग्री सेल्सियस आहे. या डबक्यात मीठ आणि लोह्याची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर याचे पाणी लाल रंगाचे असून, पाण्यातून बाष्फ निघत असते. याला जागेला बघून असे वाटते की, जणू हे नरकाचा दरवाजाच आहे.

हे म्यानमारचे ‘रामी द्वीप’ आहे. येथे खाऱ्या पाण्याचे अनेक झरे आहेत आणि यामध्ये खतरनाक मगरी देखील आहेत. सांगण्यात येते की, द्वितीय विश्व युद्धादरम्यान ब्रिटिश सैनिकांपासून वाचण्यासाठी 1000 जापानी सैनिक या द्विपवर पोहचले. मात्र यातील अनेक सैनिक मगरींचे शिकार झाले. केवळ 20 सैनिक येथून जिंवत परत आले होते.

स्पेनचे ‘रॉयल पाथ’ हे जगातील सर्वाधिक खतरनाक जागांपैकी एक आहे. हा खतरनाक रस्ता 300 ते 900 फुट उंचावर आहे. याची लांबी 1.8 मीटर आणि रूंदी केवळ तीन फुट आहे. सामान्य नागरिकांसाठी ही जागा बंद करण्यात आलेली आहे. मात्र साहसी पर्यटक येथे येतात. या जागेवरून पडल्यानंतर मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार येत असतात.

ब्राझीलमध्ये देखील अशीच एक भयानक जागा आहे. या जागेला’ स्नेक आयलँड’ म्हणजेच ‘सापांचे घर’ असे म्हटले जाते. हे आयलँड सापांनी भरलेले आहे. येथे जगातील सर्वात खतरनाक साप सापडतात. ब्राझीलच्या नौसेनेने येथे येण्यास बंदी घातली आहे.

जापानचे ‘मियाकेजीमा इजू आयलँड’ एवढे भयानक आहे की, याठिकाणी श्वास घेणे देखील अवघड आहे. या ठिकाणी जिंवत राहण्यासाठी लोकांना गॅस मास्क लावावा लागतो. येथील वातावरणात विषारी गॅसची मात्रा मोठ्या स्तरावर पोहचली आहे. येथील ओयामा ज्वालामुखी नेहमी फुटत असतो.

Leave a Comment