या ठिकाणी आहे ‘सापांचे राज्य’, येथे गेलेला जिंवत परत येत नाही


तुम्ही कधी अशा जागेबद्दल ऐकले आहे का ? जेथे माणसांचे नाही तर सापांचे राज्य आहे. अशा ठिकाणी जाणे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. या ठिकाणी एवढे साप आहेत की, जर एखादा व्यक्ती चुकून या ठिकाणी गेला तो जिंवत परत येत नाही.

ही भयानक जागा ब्राझीलमध्ये आहे. या जागेला ‘स्नेक आयलँड’ म्हणजेच ‘सापांचे राज्य’ या नावाने ओळखले जाते. लांबून बघितल्यावर हे आयलँड सुंदर दिसते. मात्र जगातील सर्वात भयानक साप याच ठिकाणी आढळतात.

स्नेक आयलँडवर वाइपर प्रजातीचे साप देखील पाहायला मिळतात. वाइपर प्रजाती म्हणजे उडणारे साप.  सांगण्यात येते की, या सापाचे विष एवढे भयानक असते की, माणसाचे मास देखील शिल्लक राहत नाही.

या आयलँडवर वेगवेगळ्या प्रजातीचे 4000 साप आहे.  ब्राझीलच्या सैन्याने सामान्य माणसांना या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. या ठिकाणी सापांशी संबंधित तज्ञ लोकांनाच संशोधनसाठी जाण्यास परवानगी आहे. ते लोक देखील केवळ किनाऱ्यावरच संशोधन करून परतात. आयलँडच्या आतील भागात जाण्याची त्यांच्यात देखील हिम्मत नसते.

असे असले तरी, अनेक शिकारी अवैधरित्या येथील साप पकडतात व त्यांना विकतात. या ठिकाणी दिसणाऱ्या गोल्डने लांसहेड वाइपरची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 18 लाख रुपये आहे.

Leave a Comment