भारतातील असे ठिकाण जेथे पेट्रोल-डिझेलशिवाय चालतात गाड्या


तुम्ही कधी विना पेट्रोल-डिझेलची गाडी चालताना बघितली आहे का  ? नाही ना. मात्र भारतात असे एक ठिकाण आहे जेथे विना इंधनाच्या गाड्या चालतात. या रहस्मयी पर्वतांमध्ये जर एखाद्याने रात्री गाडी उभी केली तर सकाळपर्यंत ती गाडी गायब झालेली असेल. हे कसे होते ते आजपर्यंत रहस्यच आहे.

हा रहस्मयी पर्वतांचा भाग लद्दाखच्या लेह भागात आहे. हा पर्वतांचा भाग जादू पेक्षा कमी नाही.  वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या पर्वतांमध्ये चुंबकीय शक्ती आहे. ही शक्ती गाड्यांनी 20 किलोमीटर प्रती तासाच्या गतीने स्वतःकडे ओढते. यामुळे याला ‘मॅग्नेटिक हिल’ देखील म्हणतात
मॅग्नेटिक हिल बरोबरच या जागेला ‘ग्रॅविटी हिल’ म्हणून देखील ओळखले जाते. या पर्वतांवर गुरूत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही. गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार, कोणत्याही वस्तूला उतारावरून खाली सोडून दिले तर ती वस्तू खाली गरंगळते. मात्र या पर्वतांवर तसे होत नाही.

येथे एखाद्या कारला गेअरमध्ये टाकून सोडून दिले तर गाडी खाली जाण्याऐवजी वरती चढते.  येथे एखाद्या पातळ पदार्थाला खाली टाकले तरी ते खालच्या बाजूला न जाता वरच्या दिशेने वाहते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, गुरूद्वारा पठार साहिबच्या जवळ स्थित पर्वतांमध्ये चुंबकीय शक्ती आहे. या शक्तीपासून आकाशातून उडणारी विमाने देखील वाचू शकत नाही.

या पर्वतांवरून विमान घेऊन गेलेल्या अनेक पायलट्सचा दावा आहे की, येथून जाताना अनेक झटके बसतात. पर्वतांच्या चुंबकीय शक्तीपासून वाचण्यासाठी विमानाचा वेग वाढवावा लागतो.

अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, या भागाची रचना दृष्टी भ्रम करणारी आहे. त्यामुळे खाली घसरणारी वस्तू वरच्या बाजूला चढताना दिसते.

Leave a Comment