या गड्याने बनवला चक्क पाच दिवस कमोडवर बसण्याचा जागतिक विक्रम


ऑस्टेंड – सलग पाच दिवस कमोडवर बसण्याची शर्यत बेल्जियममध्ये एका ४८ वर्षीय व्यक्तीने लावली होती. गिनीज बुकात या जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. हा विक्रम करणाऱ्या ४८ वर्षीय जिम्मी डे फ्रेन यांनी सांगितले, कमोडवर बसण्याची मी माझ्या मित्रासोबत शर्यत लावली होती. मी त्यानंतर गिनीज बुकच्या पथकाशी बोललो. फ्रेन यानंतर १६५ तास कमोडवर बसून होता. हा विक्रमच ठरला. दर ५ तासांनंतर त्यांना ५ मिनिटे उभे राहण्याची सूट मिळाली होती.

Leave a Comment