5जी नेटवर्कमुळे होऊ शकतात कॅन्सर आणि वांझपणासारखे गंभीर आजार


भारताबरोबरच जगभरामध्ये नेक्सट जनरेशन नेटवर्क 5जी वर काम सुरू आहे. सॅमसंगने 5जी स्मार्ट फोन बाजारात आणले आहेत तर अनेक कंपन्या 5जी कनेक्टेड कार बाजारात आणत आहेत. चीनने देखील 5जी च्या व्यवसायिक वापरासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे चीनच्या टेलीकॉम क्षेत्रात क्रांती होणार आहे. 5जीच्या स्पीडबद्दल सांगण्यात येत आहे की, यामुळे मोठमोठ्या फाईल्स सहज डाऊनलोड करणे शक्य होतील. मात्र याचबरोबर 5जी मुळे आरोग्यावर होणाऱ्या चर्चांबद्दल देखील मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे. सांगण्यात येत आहे की, 5जी मुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची देखील शक्यता आहे. जाणून घेऊया 5जी मुळे काय परिणाम होतील.

रशियन टाइम्स चॅनेलने काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमामध्ये 5जी मनुष्यासाठी घातक असल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमाच्या पॅनेलमध्ये बसलेल्या तज्ञांनी दावा केला आहे की, 5जी राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून, मनुष्याच्या आरोग्यावर देखील याचा प्रभाव पडेल. चॅनेलच्या रिपोर्टमध्ये दाखवण्यात आले आहे की, 5 जीच्या रेडिएशनमुळे कॅन्सर, वांझपणा आणि अल्जाइमरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. असे असले तरी वैज्ञानिकांनी चॅनेलच्या या दाव्याबाबत पुष्ठी केलेली नाही. तसेच चॅनेलने देखील या दाव्याबाबत काही ठोस वैज्ञानिक पुरावे दिलेले नाहीत.

मोबाईल फोनमध्ये उपयोग करण्यात येणाऱ्या विद्युत चुंबकिय विकिरणांबद्दल अनेक देशांमध्ये वेगवेगळी मते आहेत. अनेकांचा दावा आहे की, 5जी मुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. वर्ष 2014 मध्ये विश्व आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, मोबाईल फोनच्या नेटवर्कमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. मात्र संघटनेने इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरद्वारे सांगितले की, रेडिओ फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे कॅन्सर होऊ शकतो. मोबाईल सिग्नल हे रेडिओ फ्रिक्वेंसीवरच काम करतात.

अनेक लोकांना माहिती आहे की, एक्सरे, एफएम रेडिओ आणि कंम्प्युटरमधून विकिरणे निघतात. ही विकिरणं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे आयोनाइजिंग आणि दुरसे म्हणजे नॉन आयोनाइजिंग. नॉन आयोनाजिंग विकिरण कमजोर असतात. ते मनुष्याच्या शरीरातील केमिकल बॉन्ड्स तोड्यास सक्षम नसतात. एफएम रेडिओ, एक्सरे, मोबाईल आणि वाय-फाय हे नॉन आयोनाइजिंगच्या श्रेणीमध्ये येतात. तर आयोनाइजिंग श्रेणीमध्ये एक्सरे येतात. जे आरोग्यासाठी घातक आहेत. यानुसार 5जी आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. मात्र चोवीस तास 5 जी नेटवर्कच्या जवळ असणे धोकादायक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment