मॉडेलिंग करून आजीबाईने शोधला कर्जफेडीचा मार्ग


द.कोरियातील ७७ वर्षीय चोई सून या आजीबाईनी मनात असेल तर काहीही करून कर्जफेड करता येते याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. या आजीबाईनी पैसे मिळविण्यासाठी ७७ व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केले आणि द. कोरियातील सर्वात बुजुर्ग मॉडेल बनण्याचा मान पटकावला. आज चोई सून फॅशन आयकॉन बनली आहे. फॅशन विक रँप वॉक करून ती चांगलीच चर्चेत आली आहे.

चोईचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण आहे. आर्थिक तंगी तिच्या पाचवीला पुजलेली. पती सोडून गेल्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी खांद्यावर. तिने अनेक वर्षे हॉस्पिटलमध्ये नोकरी केली आणि त्यातून कर्ज फेड करत राहिली. पण नोकरीतून मिळणारा बराचसा पैसा कर्जफेडीत जात होता. एकवेळा जेवण म्हणजे चैन ठरली होती. कमाईचा अन्य मार्ग दिसत नव्हता. चोई सांगते, मी अतिशय त्रासले होते, थकले होते आपण आपले जीवन आपणच बदलले पाहिजे असे वाटत होते.


अश्यावेळी टीव्हीवर तिच्या पाहण्यात एक जाहिरात आली आणि त्यातून आपण मॉडेलिंग करावे अशी कल्पना तिला सुचली. त्यासाठी आवश्यक शिक्षण तिने घेतले. पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्याचा हा चांगला मार्ग आहे असे तिला अनुभवास आले. अनेक कंपन्यांकडून तिला ऑफर येत आहेत. ती म्हणते, खऱ्या आयुष्यात आणि सोशल मिडियावर लोकांची पसंती मिळते आहे. आता वय लपविण्यासाठी केसांना कलप लावण्याची गरज नाही. हॉस्पिटलमध्ये नोकरी करताना वय लपविण्यासाठी केसांना डाय लावत होते कारण रुग्ण म्हातारे माणूस त्यांची सेवा करताहेत हे पसंत करत नाहीत. आजही द. कोरियात ४५ टक्के बुजुर्ग गरिबीत आयुष्य जगत आहेत असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment