हैदराबाद : राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असणाऱ्या दामपत्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर 2 पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना शासकीय नोकरीपासून ते निवडणूक यावर काही निर्बंध घालण्यात येणार आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारच्या या उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयकावरुन हल्लाबोल केला आहे. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
ओवैसी यांचा योगी सरकारच्या लोकसंख्या विधेयकावरुन हल्लाबोल
यूपीतील 150 पेक्षा अधिक भाजप आमदारांना 2 पेक्षा अधिक मुले आहेत. त्यांचेही तिकीट भाजप कापणार का, असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला. ओवैसी योगींना आव्हान देताना म्हणाले की, मी डिबेट करायला तयार आहे. यूपी सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कोरोना काळात देशाची वाईट स्थिती झाली. अनेक तरुणांनी आपला रोजगार गमावला. अशा बेरोजगार तरुणांना सरकार रोजगार का देत नाही, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला.