माही धोनीच्या नव्या लुकवर चाहते फिदा

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल स्थगित झाल्यावर सिमला येथे कुटुंबाबरोबर सुटीवर गेलेल्या माहीचे फोटो नुकतेच झळकले होते आणि त्यात हिमाचली टोपी आणि मोठ्या मिशा असलेला त्याचा लुक चर्चेत आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा माहिचा नवा लुक समोर आला असून त्याच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

माही केसाबाबत नेहमीच वेगळ्या स्टाईल करतो. यावेळी त्याची हेअरस्टाईल आणखी वेगळी असून सेलेब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम याने धोनीला नवे रूप दिले आहे. अलीम यानेच धोनीचा नवा लुक आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये धोनीची हेअरस्टाईल आणि दाढी दोन्ही नव्या रूपात दिसत आहे.

क्रिकेट मध्ये पदार्पण केले तेव्हा धोनीचे केस चांगलेच लांब आणि सोनेरी रंगाचे होते. त्याचा तो लुक खुपच फेमस झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये ती २० वर्ल्ड कप जिंकल्यावर धोनीने केस पूर्ण कापून टाकले होते आणि त्याच्या चाहत्यांना त्याचा हा अवतार सुद्धा आवडलाच होता. अलीम अनेक सेलेब्रिटी साठी हेअरस्टायलिस्ट म्हणून काम करतो.