उलेफोन पॉवर आर्मर १३ स्मार्टफोन आला, १३२०० एमएएच बॅटरी सह

उलेफोन पॉवर आर्मर १३ (Ulefon power Armor 13) हा जगातील दोन नंबरचा सर्वाधिक मोठ्या बॅटरीचा स्मार्टफोन २ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनला १३२०० एमएएचची बॅटरी दिली गेली असून पाच दिवस बॅकअप मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. ६०० तास स्टँडबाय मिळणार आहे.

जगातील सर्वधिक मोठ्या म्हणजे १८००० एमएएच बॅटरीचा फोन एनर्जायर पॉवर मॅक्स पी १८ के हा आहे. त्यानंतर मोठी बॅटरी उलेफोन पॉवर आर्मर १३ या फोनची असून या फोनला ६.८१ इंची फुल एचडी स्क्रीन, अँड्राईड ११ ओएस, ८ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. रिअरला चार कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा आहे. ८ एमपीचे वाईड अँगल, २ एमपीचे मॅक्रो, २ एमपीचे डेप्थ सेन्सर असून सेल्फी साठी १६ एमपीचा कॅमेरा आहे. फोनचे वजन सुमारे अर्धा किलो आहे.

हा फोन २ ऑगस्ट रोजी अलीएक्सप्रेस व बेंगगुड वरून विक्री साठी उपलब्ध होत आहे. या दिवशी हा फोन २९९.९९ डॉलर्स म्हणजे २२३११ रुपयात मिळणार आहे तर त्यानंतर त्याची किंमत ४९९.९९ डॉलर्स म्हणजे ३७१८७ रुपये होणार आहे असे समजते. या फोन साठी वायरलेस चार्जर, फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर अशी फिचर्स सुद्धा दिली गेली आहेत. ड्युअल सीम आणि युएसबी सी चार्जिंग फोन सह हा फोन उपलब्ध आहे.