टोकियो : भारतीय बॉक्सर लवलिनाने महिला बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. लवलीनाने या विजयासह इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झाले आहे. भारताच्या लवलीनाने क्वार्टर फायनलमध्ये चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. लवलिनाने 69 किलोग्राम गटात भारताला आणखी एका पदक मिळवून दिले आहे.
Tokyo Olympics : महिला बॉक्सिंगमध्ये भारताचे पदक निश्चित; लवलीनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनाने मेडल निश्चित केले आहे. आता लवलीनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. भारताकडून 69 किलोग्राम गटात लवलीना मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. पण यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
लवलीनाच्या सामन्याआधी महिला बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजनगटात भारताला निराशा हाती लागली. भारताच्या सिमरनजीतचा पराभव झाल्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. सिमरनजीतला 5-0 अशा फरकाने हार पत्कारावी लागली. यासोबतच सिमरनजीतचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.