Tokyo Olympics : आयर्लंडवर भारतीय महिला हॉकी संघाची 1-0 ने मात


टोकियो – भारतीय महिला हॉकी संघाने नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जीवावर आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान या विजयामुळे अद्याप कायम राहिले आहे.

भारतीय महिला संघासाठी भारत-आयर्लंड महिला हॉकीचा आजचा सामना हा ‘करो या मरो’ स्थितीचा होता. त्यामुळे आजचा सामना जिंकायचाच या इराद्याने प्रत्येक खेळाडू मैदानात उतरल्याचे दिसून आलं. खेळ रंगात आला असताना 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने एका पासवर अप्रतिमरित्या चेंडू जाळ्यात ढकलला आणि भारताने शेवटच्या क्षणी 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय महिला हॉकी संघाच्या आजच्या विजयामुळे संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान कायम असून पदकाच्या आशा अद्याप कायम आहेत.