कोकण दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले होते. दौऱ्यासाठी आलो असताना एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

आम्ही दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. पूरस्थिती पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. लोकांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारणे, दाखवणे आमचे काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचे काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात, तिथे अधिकाऱ्यांनी आलेच पाहिजे, असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावले होते, पत्र पाठवून सांगितले होते. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केल्याचे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिले आहे.

एखाद्या ठिकाणी ज्यावेळी जाता त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असले तरी असेच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मध्ये आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की आम्ही देखील जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंचे नाव न घेतला गुरुवारी नाराजी जाहीर केली होती.