चीन बळजबरीने तिबेटियन नागरिकांना बनवत आहे सैनिक; भारताविरूद्ध तैनात करण्याचे मनसुबे


तिबेट – आता तिबेटीयन नागरिकांना बळजबरीने सैनिक बनवायला चीनने सुरुवात केली आहे. प्रत्येक तिबेटियन कुटुंबातील एका सदस्याला सैनिक बनवणे चीनने अनिवार्य केले आहे. या सैनिकांची भरती पीपल्स लिब्रेशन आर्मीमध्ये करण्यात येणार आहे. बोलले जाते, की या तिबेटियन सैनिकांचा वापर चीन लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर अर्थात एलएसीवर भारताविरुद्ध करायच्या तयारीत आहे.

यात गंभीर बाब म्हणजे, पीएलएमध्ये सामील होण्यासाठी या तिबेटियन तरुणांना लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले असून त्यांनी आपल्या एका वृत्तात म्हटले आहे, की एलएसीवर आपली स्थिती कुठल्याही स्थितीत मजबूत करण्यासाठी चीन धडपडत असल्यामुळेच चीनने प्रत्येक तिबेटी कुटुंबातून एक सदस्य पीएलएमध्ये भरती होणे अनिवार्य असल्याचा फर्मानच सोडले आहे. चीन या तिबेटी सैनिकांना एलएसीजवळ म्हणजेच लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तैनात करणार आहे.

चीन आपल्या सैन्यात ज्या तिबेटी सैनिकांची नियुक्ती करत आहे, ते सर्व चीनमध्येच राहतात. सूत्रांच्या हवाल्याने मांध्यमांमध्ये प्रसिद्द झालेल्या वृत्तांनुसार, अशा स्वरुपाची गुप्त माहिती मिळाली आहे, की चिनी आर्मी तिबेटियन तरुणांची भरती करत आहे आणि एलएसीवर स्पेशल ऑपरेशन्सची तयारीही सुरू आहे. त्यामुले या नव्या सैनिकांचा रेग्यूलर अभ्यास सुरू आहे. तिबेटीयन सैनिकांना याअंतर्गत चिनी भाषा शिकण्यासाठी सांगण्यात येत आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि पार्टीचे नियम सर्वाच्च असल्याचे मानण्यास सांगण्यात येत आहे.