ट्विटरवर आता करता येणार शॉपिंग

मायक्रोब्लोगिंग साईट ट्विटरने नवीन फिचरचे टेस्टिंग सुरु केले असून त्यामुळे युजर्स ट्विटर वरून शॉपिंग करू शकणार आहेत. सध्या हे फिचर अमेरिकेत लाँच केले गेले असून काही ब्रांड सोबत त्याच्या टेस्ट सुरु आहेत. अमेरिकन युजर्स आयओएस डिव्हाइस वरून फक्त इंग्रजी भाषेत त्याचा वापर करू शकणार आहेत. या संदर्भातील माहिती ट्विटरने ब्लॉग वर दिली आहे.

त्यानुसार ट्विटर शॉप मोड्युल प्रोफाईल सर्वात वर दिसेल. त्यात बिझिनेस बाबत सर्व माहिती दिली गेली असून प्रोफाईलला व्हिजीट करून युजर्स शॉपिंग करू शकतील. एखादी वस्तू आवडली तर टॅप करून ती खरेदी करता येणार आहे. खरेदीसाठी अॅप बाहेर येण्याची गरज पडणार नाही. सध्या या फिचरचे टेस्टिंग सुरु असून युजर्सच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन सर्व युजर्स साठी ते लाँच केले जाईल. याबाबत ट्विटर अन्य कंपनी ब्रांड बरोबर चर्चा करत असल्याचेही सांगितले जात आहे.