Tokyo Olympics : पीव्ही सिंधूने क्वार्टर फायनल्समध्ये मिळवले स्थान


टोकियो – भारतीयांना बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. आज टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना सिंधूने जिंकला आहे. सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवले आहे. राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी पराभव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूने 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूने क्वॉर्टर फायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधू आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 ने आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूने 21-13 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूने मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. दोन सेटमध्येच सिंधूने मियाचे आव्हान संपुष्टात आणले. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूने पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.