पुन्हा युएफओ? जर्मन प्रवाशाने शेअर केला व्हिडीओ

जगात अनेकांनी उडत्या तबकड्या किंवा युएफओ आणि एलियन्स म्हणजे परग्रहवासी पाहिल्याचे दावे केले आहेत मात्र वैज्ञानिकांना त्या संदर्भात ठोस म्हणता येतील असे पुरावे मिळालेले नाहीत. अमेरिका, युके मध्ये अनेकदा उडत्या तबकड्या दिसल्याचे दावे केले गेले असून अलीकडच्या काही महिन्यात तर वारंवार असे दावे केले जात आहेत. एका जर्मन प्रवाशाने विमानातून जात असताना एक युएफओ त्याच्या विमानाच्या जवळून सतत सात मिनिट उडत असल्याचा आणि त्या दरम्यान अनेकदा तिने आकार बदलल्याचा दावा केला असून त्याचा व्हीडीओ शेअर केला आहे.

द. सन मधील बातमीनुसार हा जर्मन प्रवासी विमानातून प्रवास करत होता तेव्हा जमिनीपासून हजारो फुट उंचीवर त्याच्या विमानाच्या जवळून एक अज्ञात प्रकाशमान वस्तू सतत ७ मिनिटे प्रवास करत होती. या वस्तूतून पांढरा प्रकाश येत होता आणि तिचा आकार बदलत होता. शेवटी तिचा आकार इंग्लिश वाय या अक्षराप्रमाणे दिसत होता. या प्रवाशाने या सर्व घडामोडीचे फोटो काढले, व्हिडीओ काढला आणि तो शेअर केला आहे. युएफओ रेडीट पेजवर हे फुटेज शेअर केले गेले आहे.

यामुळे पुन्हा एकदा परग्रहवासी आणि उडत्या तबकड्या यावरील चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे.