राज कुंद्रामुळे सोशल मीडियावर ट्रेंड झाला #bollywoodstopvulgarity हॅश टॅग


सिनेरसिक सोशल मीडिया सुरू झाल्यापासून आपली मते न घाबरता व्यक्त करत असल्याचे आपण पाहतच आहात. गेल्या काही आठवड्यांपासून बॉलीवूडमध्ये राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणाने बराच जोर घेतला आहे. राजला २० जुलै रोजी मुंबई पोलीसांनी अटक केली असून काल त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करुन ते ‘हॉटशॉट’ अॅपवर अपलोड करणे यासाठी राजला अटक झाली आहे. यानंतर सध्या बायकॉट बॉलीवूड असा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी नेटकरी ट्विट करून करताना दिसत आहेत. ट्विटरवर मीम्स शेअर करत बॉलीवूडमध्ये अश्लीलता आधीपासूनच असल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच भारतीय संस्कृतीला या चित्रपटांमुळे धोका आहे, असे ही त्यांना वाटते. बॉलीवूड बरोबरच ओटीटीवर ही बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करताना दिसत आहे. एका युजरने हॅशटॅग #bollywoodstopvulgarity असे ट्विट केले आहे.

दुसऱ्या युजरने ट्विट असे केले आहे की, बॉलीवूडमुळे भारतीय संकृतीला धोका निर्माण होत आहे. या गोष्टीला लवकरात लवकर थांबवावे लागेल. या पुढे अजुन एक ट्विट् करत त्या युजरने लिहिले की, आजवर नेहमीचे चुकीच्या गोष्टींना बॉलीवूड प्रमोट करत आले आहे.

पोलिसांनी राज कुंद्राला अटक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या वर्षी फेब्रुवारीत मढ येथील एका बंगल्यावर धाड टाकली होती. त्यानंतर पोलिसाना या प्रकरणामागचा मुख्य सूत्रधार राज कुंद्रा असल्याची माहिती मिळताच, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होताना दिसत आहेत.