या या ठिकाणी आहेत विजय माल्ल्याच्या मालमत्ता

ब्रिटन उच्चन्यायालयाने फरारी भारतीय उद्योजक विजय माल्या याला दिवाळखोर जाहीर केल्यामुळे आता भारतीय बँका जगभरातील त्याच्या मालमत्ता जप्त करू शकणार आहेत. विजय माल्याच्या मालमत्ता अनेक देशात आहेत. त्यातील सर्वात मोठी मालमत्ता बंगलोर युबी सिटी किंगफिशर टॉवर मध्ये ३२ व ३३ व्या मजल्यावर असलेले व्हाईट हाउस इन द स्काय. ८२ अपार्टमेंट असलेल्या या इमारतातील १० अपार्टमेंट माल्याकडे आहेत.

फ्रांसच्या सॉसालीनो येथे माल्याची अलिशान हवेली बे ब्रीज किनारी आहे. टायगर वूड्स, विलियम्स भगिनी यांचे सुद्धा येथे बंगले आहेत. १९८४ मध्ये माल्याने ही हवेली १२ लाख डॉलर्सना खरेदी केली होती. अमेरिकेच्या न्युयॉर्क ट्रम्प टॉवरमध्ये माल्ल्याने २४ लाख डॉलर्सचे पेंट हाउस पूर्वीच खरेदी केले आहे. द. आफ्रिकेत नेटलटन रोड वर एक शानदार हवेली असून गोव्यात अलिशान किंगफिशर व्हिला आहे. भारत सरकारने हा व्हिला २०१७ मध्ये जप्त केला असून त्याची किंमत ७० कोटी रुपये सांगितली जाते.

स्कॉटलंड येथे काही किल्ले व लंडन येथे अनेक फार्म हाउस माल्याने खरेदी केली आहेत. त्याने सेंट मार्गुराइट नावाचे एक बेट खरेदी करून त्यावर अलिशान व्हिला बांधला आहे. मॉन्टेकार्लो मध्येही त्याचे एक बेट आहे. माल्याचे खासगी जेट भारतातील सर्वात लग्झरी खासगी जेट मानले जात होते. १५२ कोटी रुपये किमतीचे हे जेट एका अमेरिकन कंपनीने ३५ कोटी मध्ये लिलावात खरेदी केले आहे. माल्या कडे लग्झरी आणि विंटेज २५० कार्स आहेत. माल्याचे एक खासगी याट २०११ मध्ये विकले गेले आहे. इंडियन इम्प्रेस नावाच्या या ९५ मीटर लांबीच्या याट वर हेलिपॅड होते.

माल्याने आयपीएल रॉयल चॅलेंजर बंगलोर संघ खरेदी केला होता तसेच ईस्ट बंगाल व मोहन बागान एसी फुटबॉल क्लबची मालकी त्याच्याकडे आहे. फॉर्म्युला वन टीमचा माल्या को ओनर आहे. त्याचे नाव सहारा फोर्स इंडिया असे आहे.