टीरोमिसा मिठाई कोडनेमने येणार अँड्राईड १३ ओएस

दिग्गज टेक कंपनी गुगलने अँड्राईड १२ ओएस व्हर्जन नुकतेच रिलीज केले आहे आणि आता अपग्रेडेड व्हर्जन अँड्राईड १३ वर काम सुरु झाले आहे. एक्सडीए डेव्हलपमेंट रिपोर्ट नुसार गुगलच्या या ओएसच्या कोडनेमची माहिती ओपन सोर्स प्रोजेक्टवरून मिळाली असून हे व्हर्जन इटालियन मिठाई टीरोमिसा वरून हे नाव दिले जात आहे.

गुगल त्यांच्या सर्व अँड्राईड व्हर्जन कोडनेम अल्फाबेटीकल ऑर्डर वरून ठरविते. अँड्राईड १२ चे कोडनेम स्नो कोन होते तर त्यापूर्वीच्या अँड्राईड १.५ चे कोडनेम कप केक, अँड्राईड १.६ चे कोड नेम डोनट, अँड्राईड नाईनचे कोडनेम पाय होते. मे २०२१ मध्ये अँड्राईड १२ ओएस रिलीज केली असून ही ओएस रिडीझाइन केली गेली आहे. त्यात अनेक फिचर्स जोडली गेली आहेत. त्यामुळे युजर्सला सहज काम करणे शक्य झाले आहे.

या ओएस मध्ये मल्टीडिव्हाइस कनेक्टीव्हिटी फिचर असून युजर त्यामुळे स्मार्टफोन कारशी जोडू शकतो. तसेच एनएफसीच्या मदतीने कार अनलॉक करू शकतो.