इन्स्टाग्रामवर अशी करा कमाई

तुम्ही इन्स्टाग्राम युजर असाल आणि इन्स्टाग्राम सोशल नेटवर्क साईटचा वापर करत असाल तर मनोरंजनाबरोबर तुम्ही त्यातून चांगली कमाई करू शकता. तुमचे खूप फॉलोअर्स नसतील तरी तुम्हाला कमाईची संधी येथे मिळू शकते. फक्त १ हजार फॉलोअर्स असतील तरी तुम्ही चांगली कमाई करू शकता.

इन्स्टाग्रामवर तुम्ही इंफ्ल्यूएनझर बनून कमाई करू शकता. या अशा व्यक्ती आहेत ज्या स्वतःच्या सोशल मिडिया अकौंटवर नियमित स्वरुपात योग्य माहिती शेअर करून आपली ओळख निर्माण करतात. त्यांच्याकडे खूप फोलोअर्स असतात आणि त्या आपल्या फॉलोअर्सना प्रोडक्ट खरेदीसाठी राजी करू शकतात. तुमचे फॉलोअर्स असे प्रभावित होत असतील तर तुम्ही इंफ्ल्यूएनझर होऊ शकता. कोणत्याही ब्रांड बरोबर काम करून तुम्ही त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करून कमाई करू शकता.

अॅफीलीएट मार्केटिंग मधून सुद्धा कमाई करता येते. एखाद्या ब्रांडसाठी प्रोडक्टचा प्रचार, विक्री करून ही कमाई करता येते. मात्र त्यासाठी कमिटमेंट हवी आणि प्रोडक्टच्या प्रचार, खरेदीवर पूर्ण फोकस ठेऊन काम करायला हवे. तुम्ही जो प्रोडक्ट प्रमोट करणार त्याची लिंक संबंधित कंपनी देते आणि पोस्ट करून तुम्ही केलेल्या विक्रीवर कमिशन मिळते.

फोटोग्राफी मधून सुद्धा इन्स्टाग्रामवर कमाई होऊ शकते. स्वतः काढलेले फोटो विकणे, आर्ट इलस्ट्रेशन, व्हिडीओ, अॅनिमेशन, पेंटींग्स, सेल्फी, व्हिज्युअल कंटेंटचे हे दुसरे प्रकार. तुम्ही वॉटरमार्क सह चांगले फोटो अपलोड करू शकता.