केआरकेच्या अडचणीत वाढ; मॉडेलने केला बलात्काराचा आरोप


बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान अर्थात केआरके हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर केआरके त्याचे मत मांडताना दिसतो. केआरके गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली. पण, आता त्याच्यावरच बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

ताशा नावाच्या एका महिलेने केआरकेवर हा आरोप केला आहे. ताशा एक लोकप्रिय फिटनेस मॉडेल आहे. २६ जुन २०२१ रोजी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केआरके विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात ताशाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच केआरकेने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताशा आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तर, केआरके सध्या दुबईत असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी मिका सिंगने केआरकेसाठी एक गाणे रिलीज केले होते. या गाण्यात केआरके कुत्रा असल्याचे मिका सिंग म्हणाला होता. तर त्यानंतर केआरकेने मिका विरोधात एक गाणे रिलीज केले होते.