‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या शोमध्ये रीटा रिपोर्टरची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. प्रियाने नुकतेच एका फोटोत ब्रा स्ट्रॅप दाखवल्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. प्रियांच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी नापसंती दर्शवली होती. तर काही युजर्सनी खालची पातळी गाठत प्रियाने तिचे स्तन दाखवावे असे म्हटले होते.
‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचे ब्रा स्ट्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर
आता प्रियाने या ट्रोलिंगवरुन नेटकऱ्यांना सुनावले आहे. प्रियानेफ्रि प्रेस जनरला दिलेल्या मुलाखतीत त्या फोटोत वादग्रस्त असे काहीच नसल्याचे म्हंटले आहे. तिने यावेळी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही तिचे मत मांडले. ट्रोलिंग आणि मेसेजेचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे प्रिया म्हणाली. जर एखाद्या सेलिब्रिटीने केलेली पोस्ट पटत नसेल, तर त्याने त्या सेलिब्रिटीला अनफॉलो करावे, असे ती म्हणाली.
प्रिया या मुलाखतीत ट्रोलर्सबद्दल बोलताना म्हणाली, मला वाटते हे काही निराश लोक आहेत, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर ते काय करतात हे त्यांना समजत नाही. अशा कमेंट करणारे खरच त्यांच्या आयुष्यातही शांत नसतात आणि ते इतरांची शांती देखील भंग करतात. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की जर एखाद्या सेलिब्रिटीने शेअर केलेला फोटो तुम्हाला आवडला नसेल, तर सरळ त्याला अनफॉलो करा.
त्याचबरोबर हे सांगतानाच प्रिया म्हणाली, मी जर एखाद्या सेलिब्रिटीला फॉलो करते आणि मला काही काळाने त्याच्या किंवा तिच्या पोस्ट कंटाळवाण्या वाटू लागल्या, तर त्यांना मी पर्सनल मेसेज करून त्रास देणार नाही. दरम्यान नकारात्मकता कमी करण्यासाठी काही कमेट आपण डिलीट करत असल्याचे प्रिया म्हणाली. बऱ्याचदा अशा कमेंट न वाचताच दूर्लक्ष करत असल्याचदेखील ती म्हणाली. तर काही युजर्सला ब्लॉक करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.