दबंग खान सल्लू या लोकांना करतो फॉलो 

बॉलीवूड दबंग खान सलमानचे अनेक चाहते आहेत, देश विदेशातून सलमानचे फॅन फॉलोइंग प्रचंड मोठे आहे. सलमानचे चाहते अनेक असले तरी सलमानच्या खासगी आयुष्यात फारच थोड्या लोकांना स्थान असून सलमान केवळ ८-९ लोकांना फॉलो करत असतो. कोण आहेत या व्यक्ती?

सर्वप्रथम सलमान त्याची आवडती बहिण अर्पिता हिचा फॉलोअर आहे तसाच तिचा नवरा अतुल अग्नीहोत्री यालाही सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. सलमान भाऊ अरबाज याचाही फॉलोअर आहे. ही झाली त्याची घरची मंडळी. बॉलीवूड मध्ये सलमान पाच अभिनेत्रीना फॉलो करतो.

या बॉलीवूड हसीना मध्ये सर्वात पहिली आहे ती इसाबेल कैफ. कतरिनाच्या या बहिणीचा, सलमान कतरिनाच्या अगोदरपासून फॉलोअर असून इझाबेल बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सलमानला कतरिना आवडते आणि त्याने त्याची कबुली अनेकदा दिली आहे. या दोघांनी अनेक हिट फिल्म केल्या आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये प्रोफेशनल बॉंडिंग आहे. सलमान कतरिनाला इन्स्टाग्रामवर नेहमी फॉलो करतो.

सलमानची एकेकाळची मैत्रीण संगीता बिजलानी हिचाही सलमान फॉलोअर आहे. संगीताने क्रिकेटपटू अझरुद्दीनशी विवाह केला होता आणि त्यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र सलमान आणि संगीताच्या मैत्रीत त्यामुळे कोणताही अडथळा आलेला नाही. आजही संगीताचे सलमान कडे येणे जाणे आहे. सलमानने जिच्यासाठी बॉलीवूडचे दार उघडले ती डेझी शाह हिचाही सलमान फॉलोअर आहे. जॅकलीन फर्नांडीस बरोबर सलमानचे बॉंडिंग चांगले आहे. लॉकडाऊन काळात जॅकलीन सलमानच्या परिवारासोबत त्याच्या फार्म हाउसवर राहिली होती आणि येथेच त्यांनी म्युझिक व्हिडीओ लाँच केले होते. सलमान जॅकलीनचाही फॉलोअर आहे.