चीनचे आणखी एक पाप उघड, १९ वर्षापूर्वीच चीन मध्ये आला होता करोना

जगभरात धिंगाणा घातलेल्या करोनाचा फैलाव चीन मधून झाल्याचे आरोप सुरवातीपासून होत आहेत. अगोदर वुहानच्या मीट मार्केट मधून करोना आला असे म्हटले जात होते मात्र नंतर वुहान प्रयोगशाळेत करोना विषाणू तयार केला गेल्याचे आरोप होत असतानाच चीनचे नवे पाप उघडकीस आले आहे. कोविड ला कोविड १९ नाव देण्यामागे कोविडची पहिली केस २०१९ मध्ये सापडली हे कारण आहे. त्यानंतर करोनाने वेगाने जगभर हातपाय पसरले आणि अनेक देशांना लॉकडाऊन लावावे लागले हे सत्य असले तरी नव्यानेच आणखी एक खुलासा समोर आला आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार अमेरिकेच्या मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी स्टडीज विभागाचे वरिष्ठ संशोधक मिल्टन लिटेनबर्ग यांनी चीनच्या बीजिंग मध्ये २००२ मध्येच करोना ची पहिली केस आढळली होती असे विधान केले आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ग्वांगडोनच्या अनेक रेस्टॉरंट शेफ आणि मीट दुकानातील कसायांना या रोगाची लागण झाली होती. त्यांच्या मध्येही श्वसनास त्रास, ताप अशीच लक्षणे होती आणि लागण झालेल्यातील बहुतेक मांस व्यापाराशी संबधित होते. त्यावेळी या गुढ आजाराने डॉक्टर सुद्धा चिंताग्रस्त होते. जे रुग्णाची देखभाल करत होते त्यांनाही या रोगाचा संसर्ग झाला होता. या सर्व केसेस मध्ये करोनाचीच लक्षणे होती मात्र त्यावेळी तो कसा बसा नियंत्रणात आणला गेला होता. जगात त्यावेळी या आजाराच्या ७७४ केसेस होत्या.

नवीन रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे की २००२ चा हा आजार म्हणजे आजच्या परिस्थितीसाठी इशारा होता पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या सार्सनेच चीनला जगासमोर खोटे परिणाम, चुकीची माहिती देऊन आणि गडबडगोंधळ करून जगगा कसे शिकार बनविता येते याचे धडे दिले आणि चीनने त्याचा सहज वापर करून करोना जगभर पसरविला आहे. हे सारे कारस्थान चीनचेच असल्याचा आरोप यात केला गेला आहे.