व्हाईट हाऊसपेक्षाही अधिक सुरक्षा आहे या इमारतीला


राष्ट्रपती भवनाच्या इमारतीला सर्वात सुरक्षित इमारत समजले जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अमेरिकेमध्ये एक अशी इमारत आहे, जिला राष्ट्रपती भवनापेक्षाही अधिक सुरक्षा देण्यात येते. या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र हॅलिकॉप्टरची नेमणूक केलेली असते. तुम्हाला वाटत असेल अशी कोणती इमारत आहे. चला तर मग जाणून घेऊया.

या इमारतीला फोर्ट नॉक्स या नावाने ओळखले जाते. फोर्ट नॉक्स हे अमेरिकेच्या सैनिकांची एक पोस्ट आहे. जी केंटुकी राज्यात आहे. या इमारतीला जगातील सर्वात सुरक्षित इमारत समजले जाते. या इमारतीची निर्मिती अमेरिकेद्वारे 1932 मध्ये करण्यात आले होते. येथील सुरक्षा एवढी कडक आहे की, एक पाखरू देखील आत जाऊ शकत नाही. या इमारतीच्या चारही बाजूला भिंती असून या भिंती ग्रेनाइटपासून बनवण्यात आलेल्या आहेत. या इमारतीच्या सुरक्षेसाठी तब्बल 30 हजार सैनिक असतात.फोर्ट नॉक्सचे छत हे पुर्णपणे बॉम्ब फ्रुफ आहे. यावर कोणत्याही बॉम्बचा काहीही परिणाम होत आहे. याशिवाय आजबाजूला अनेक अलार्म सिस्टम आहेत. सुरक्षेसाठी हॅलिकॉप्टर्स आहेत. परवानगी शिवाय इमारत तर सोडाच या भागात जाण्याची देखील कोणाला परवानगी नाही.

फोर्ट नॉक्स ही रिजर्व सोने ठेवण्याची जागा आहे. याठिकाणी तब्बल 42 लाख किलो सोने ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय या ठिकाणी अमेरिकेचे स्वातंत्र्य घोषणा पत्र, गुटनबर्गचे बायबल आणि अमेरिकन संविधानाची खरी कॉपी अशा महत्त्वपुर्ण गोष्टी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत.
ज्या ठिकाणी सोने ठेवण्यात आलेले आहे तेथे 22 टनांचा एक भक्कम दरवाजा आहे. 

हा दरवाजा खोलण्यासाठी एका विशेष कोडची आवश्यता असते व हा कोड या बिल्डिंगमध्ये मोजक्याच लोकांना माहित आहे. कोणत्याच कर्मचाऱ्याला इतर कर्मचाऱ्याचा कोड माहिती नसतो. त्यामुळे एका व्यक्तीच्या कोडने दरवाजा उघडला जाऊ शकत नाही.

Leave a Comment