पावसाळ्यात आजारी पडल्यावर करा या गोष्टी


पहिल्या पावसाबरोबर आजारपण देखील येत असते. या हवामानात तापमानातील उतार-चढावामुळे सर्दी-ताप येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला देखील असे आजार झाले असतील, तर चिंता करण्याची काहीही गरज नाही. काही घरगुती उपचारांद्वारे या आजारांवर उपाय करता येतो. एलोपैथिक औषधांचा परिणाम सर्दी झाल्यावर शक्यतो होत नाही. असेच काही उपाय जाणून घेऊया, जे या आजारांपासून सुटका करू शकतील.

पावसाळा असो अथवा हिवाळी दोन्हीमध्ये भाज्यांचे अथवा चिकनचे सुप फारच फायदेशीर असते. अस्थमा असणाऱ्यांसाठी तर चिकनचे सुप फारच फायदेशीर आहे. सुप घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. ताप असताना सुपचे सेवन केल्याने तोंडाची चव देखील बदलते.

सर्दीमुळे होणारे घशांचे आजार अथवा खोकला यावर औषधी चहा खुपच फायदेशीर ठरतो. अदरक, तुळस, काळी मिर्च, सुंठ, हळद, गुळ यांसारख्या पदार्थांपासून बनवण्यात आलेला चहा घशासाठी फारच उपयोगी ठरतो.

जीवनसत्त्व सीचे सेवन करावे –
सर्दी झाली असल्यास, आंबट गोष्टी जसे की लिंबू, संतरे, आवळा यांचे सेवन नक्की करावे. यांच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो.

फळे नक्की खा –
शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी रोज एका फळाचे सेवन करणे गरजेचे आहे. या फळांमध्ये हंगामी फळांचा वापर असेल तर आणखींच चांगले. फळांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते व सर्दी, ताप यांसारखे आजार होत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment