विज्ञान नाकारत नाही जलपऱ्यांचे अस्तित्व


जलपरी किंवा मत्स्यकन्या, मरमेड खरेच असतात का हा शोधाचा आणि रोमांचकारी, रहस्यमय विषय आहे. जलपरी ही केवळ कल्पना कि प्रत्यक्षात त्या असतात हा वादाचा विषय असू शकेल पण विज्ञान जलपरीचे अस्तित्व नाकारत नाही. त्यांच्या मते प्राचीन काळात जेव्हा मानवाचा विकास होत होता तेव्हा कदाचित पाण्यात राहण्यासाठी माणूस विकसित झाला असावा आणि त्यालाच जलपरी म्हटले जात असावे. जलपरी प्रत्यक्षात पहिल्याचा मात्र कुठेही पुरावा नाही. पण केवळ भारतीय पुराणातच नाही तर जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये जलपरयांचे उल्लेख येतात. अनेक प्राचीन शिल्पातून त्यांच्या आकृती रेखाटलेल्या दिसतात.


इतक्या मोठ्या प्रमाणावर पौराणिक कथातून मरमेड किंवा जलपरीचे उल्लेख येतात त्याअर्थी पूर्वीच्या काळी त्या अस्तित्वात असाव्यात असाही एक समज आहे. जलपरी संदर्भात अनेक रोचक कथा आजही सांगितल्या जातात. रामायण काळात रावणाची मुलगी स्वर्णमच्छा अर्धी माणूस आणि अर्धी मासोळी होती असे उल्लेख आहेत. लंकेवर आक्रमण करण्यासाठी वानरसेना सेतू बांधत असताना ती ओळीने रचलेले दगड हलवून सेतू विस्कळीत करत होती आणि वानरांना व हनुमानाला त्रास देत होती अशी कथा आहे.


महाभारत कथेत अर्जुनाची पत्नी उलूपी नागकन्या होती पण ती पाण्यात राहत होती म्हणजे ती मत्स्यकन्या होती. महाभारत कथेत सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा ही खरी अप्सरा पण शाप मिळाल्याने मासोळी बनली होती अशी कथा येते. तिच्याच पोटी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता.


केवळ भारतच नाही तर युरोप, आशिया, आफ्रिका देशात सुद्धा मत्स्यकन्याचे उल्लेख कथातून येतात. त्यांना मरमेड म्हटले गेले आहे. फ्रेंच भाषेत मर म्हणजे समुद्र आणि मेड म्हणजे तरुण स्त्री. ग्रीक देवता अटार्गेटीस ही असायतियमची आई होती पण तिचे एका मेंढपाळांवर प्रेम होते. पण तिला त्याला ठार करावे लागले याची शरम येऊन तिने पाण्यात उडी घेतली आणि मासा बनली. पण तिचे रूप पाणी दडवू शकले नाही त्यामुळे ती जलपरी बनली अशी कथा आहे.

महान योद्धा सिकंदरची बहिण मेल्यावर जलपरीचे रूप घेऊन समुद्रातून येणाऱ्या नाविकांना तिचा भाऊ जिवंत आहे का आणि राजा बनला का अशी विचारणा करत असे. जे नाविक तो सुखात आहे आणि राजा आहे असे सांगत त्यांना ती समुद्र शांत करून वाट देत असे आणि कुणी सिकंदर जिवंत नाही असे सांगितले तर समुद्रात वादळ निर्माण करून त्यांना बुडवीत असे अशी कथा येते.

Leave a Comment