दिल्ली ते थेट मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १२ तासांत करता येणार पूर्ण


नवी दिल्ली : जानेवारी २०२३ पर्यंत मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैंकी एक आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते थेट मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काम समोर येणाऱ्या अनेक अडचणींवर मार्ग काढून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली आहे. २०२०-२१ मध्ये ३६.५ किलोमीटर प्रति दिवस गतीने एक्सप्रेस निर्माणाचे काम पूर्ण करण्यात आले. आत्तापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांपैंकी हे काम रेकॉर्डब्रेक गतीने झाल्याचे गडकरींनी सांगितले. कामाची हीच गती कायम राहिली तर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम वेळेच्या अगोदरच पूर्ण होऊ शकेल.