सलमान खान नाही तर ‘हा’ सेलिब्रिटी करणार बिग बॉसच्या आगामी हंगामाचे सुत्रसंचालन


छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मोठा आणि तेवढाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोचा पहिला प्रोमो नुकताच ईदच्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. याच दरम्यान, शोच्या प्रीमियरमध्ये काही बदल करण्यात आल्याचे दिसून येणार आहे. बिग बॉसचे टेलिव्हिजन ऐवजी ओटीटीवर पहिल्यांदाच प्रिमियर होणार आहे. अशातच अशी जोरदार चर्चा सुरु आहे की, यंदाचा बिग बॉस-15 सीझन हा सहा आठवड्यांसाठी असणार आहे. तर या विशेष म्हणजे या शोचे सुत्रसंचालन सलमान खान नाही, तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक करण जोहर करणार आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्ट्सनुसार डिजिटल स्पेससाठी सलमान खान याच्या रिअॅलिटी शो चे सुत्रसंचालन करण जोहर करणार आहे. VOOTने नुकतीच बिग बॉसच्या ओटीटी प्रीमियरची घोषणा केली आहे. शोच्या पहिल्या सहा आठवड्यातील एपिसोड हे थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना हा शो 24X7 पाहता येणार आहे. निर्मात्यांकडून ही घोषणा करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये खुप उत्साह दिसून येत आहे. सलमान खान याने नुकताच बिग बॉस 15 च्या सीझनचा पहिला प्रोमो रिलीज केला होता. ज्यामध्ये सलमान खान हसत प्रेक्षकांना सुचना देत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, यंदाचा बिग बॉसचा सीझन अधिक धमाकेदार, मनोरंजनात्मक असणार आहे. ऐवढेच नव्हे तर यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण प्रतिस्पर्धी सहभागी होणार याची सुद्धा आता प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे.