दुर्घटनाग्रस्त गावांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरे रवाना, दुपारी तळीये, महाडला पोहोचणार


मुंबई – मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यभरात हाहाकार माजवला आहे. संततधार पावसामुळे रायगड, सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दरड दुर्घटनाग्रस्त घटनास्थळांसह पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

मुंबईहून आज दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तर दुसरीकडे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रायगड, रत्नागिरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते तळीये दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत.