जीवनसत्व फ बद्दल कधी ऐकलेय?

आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या जीवनसत्व किंवा व्हिटामिन्सची आवश्यकता असते. त्यातील ए, बी, सी, डी अश्या जीवनसत्वाबद्दल आपण अनेकदा ऐकतो. या जीवनसत्वाचे शरीराला उपयोग, त्याच्या कमतरतेमुळे होणारे अपाय हेही आपल्याला ऐकून माहिती असते. पण तुम्ही कधी व्हिटामिन एफ म्हणजे जीवनसत्व फ बद्दल ऐकले आहे काय? नसेल तर ही माहिती तुमच्या साठीच आहे.

व्हिटामिन एफ हे सुद्धा शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्वातील एक महत्वाचे जीवनसत्व आहे. हे व्हिटामिन आपल्या शरीरात अनेक कामे करते. यात अल्फा लीनोलेनीड व लोनोलीस अशी आम्ले असतात आणि त्याचा उपयोग हृद्य, मेंदूचे कार्य योग्य चालावे यासाठी होतो.

या जीवनसत्वाचे फायदे अनेक आहेत. हृदयरोगाची जोखीम कमी करणे, तणाव व मेंदूच्या अन्य समस्या कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, रक्त गोठण्यास मदत, सांधे. फुफ्फुसे यांची सूज कमी करणे असे त्याचे अनेक उपयोग आहेत.

या जीवनसत्वाची कमतरता असेल तर मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण होतो. केस गळतात, मुलांचा योग विकास होत नाही. त्वचा शुष्क आणि निस्तेज बनते.

हे जीवनसत्व बदाम, अंडी, मासे, मटन, चिया सिड्स, बेबी कॉर्न ऑईल, सोयाबीन तेल, जवस तेल यातून मिळते. त्यामुळे या पदार्थाच्या आपल्या आहारात समावेश असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही