राज कुंद्रा लेखकही, पुस्तकाचे नाव वाचून व्हाल हैराण

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सध्या पोर्न फिल्म चित्रीकरण आणि प्रसारण प्रकरणात पोलीस चौकशीच्या घेऱ्यात सापडला आहे. राज याचे अनेक उद्योग, त्याची कमाई, श्रीमंती या विषयी दररोज नवनवीन बातम्या येत आहेत. अश्याच आणखी एका बातमीनुसार राज कुंद्रा उद्योजक आहे तसाच लेखक सुद्धा आहे. त्याने आर्थिक विषयावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन पेंग्विन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने केले आहे.

सध्या राज कुंद्रा यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु असून राजच्या लिंक्डेन अकौंटवरून ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अवैध धंदे करून रोजची ८ लाखाची कमाई करणाऱ्या राज कुंद्रा याच्या पुस्तकाचे नाव वाचून कुणीही हैराण होईल. या पुस्तकाचे नाव आहे,’ हौ नॉट टू मेक मनी’ म्हणजे थोडक्यात पैसा कसा मिळवू नये. ऑक्टोबर २०१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात अवैध दारू धंदा करून पैसा मिळविणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी राज याने लिहिली आहे.