अटकेपासून बचावासाठी राज कुंद्राने पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच?


मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. त्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणी पोलिसांवरच आरोप लावण्यास सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी फरार असलेला आरोपी यश ठाकूर याने असा दावा केला आहे की, राज कुंद्रा याने पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच त्याने दिली होती. याबद्दल यश ठाकूर याने म्हटले की, त्याच्याकडून सुद्धा पोलिसांनी लाच मागितली होती.

नवभारत टाइम्समध्ये छापण्यात वृत्तानुसार माहितीनुसार, या प्रकरणी महाराष्ट्र अँन्टी करप्शन ब्युरो यांना यश ठाकूर याने ईमेल लिहून पाठवत तक्रार केली होती. त्याने दावा केला की, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा याच्याकडून 25 लाख रुपये लाच घेतली आहे. त्यानंतर लाचलुचपत विभागाने ईमेल मुंबई पोलीस आयुक्तांना फॉरवर्ड केला होता. सध्या यश पॉर्न फिल्ममधील फरार आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. अश्लील फिल्म प्रकरणी राज कुंद्रा आणि त्याचा आयटी हेड रायन थार्पसह 11 लोकांना अटक केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पहिली अटक झाली होती.