भारतात आज लॉन्च होणार वन प्लसचा प्रीमियम स्मार्टफोन


नवी दिल्ली – आज भारतात प्रिमियम स्मार्टफोन कंपनी वन प्लसचा नवा स्मार्टफोन वन प्लस Nord 2 लॉन्च करण्यात येणार आहे. स्मार्टफोनची किंमत लॉन्च होण्यापूर्वी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन व्हेरियंट्समध्ये हा फोन बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. ज्याची किंमत 25,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते. या फोनसोबत कंपनी ट्रूली वायरलेस स्टीरियो इयरबड्स वन प्लस Buds Pro देखील बाजारात लॉन्च करणार आहे.

6.43 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले वन प्लस Nord 2 5G मध्ये दिला जाऊ शकतो. फोनचे दोन व्हेरियंट्स 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज, तसेच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसोबत लॉन्च करण्यात येणार आहे. फोनमध्ये 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.

जबरदस्त कॅमेरा फिचर्स युजर्सना वन प्लस Nord 2 5G मध्ये पाहायला मिळतील. यामध्ये एआय व्हिडीओ एन्केसमेंट फिचर देण्यात आल्यामुळे रेकॉर्डिंगचा वेळ HDR इफेक्ट सुरु होईल. यामुळे शानदार कॅमेरा रिझल्ट मिळतील. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. वन प्लस Nord 2 5G स्मार्टफोनसोबत कंपनी वन प्लस Buds Pro देखील लॉन्च करु शकते. गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या वन प्लस Budsचे हे अपडेटेड वर्जन आहे. याची खासियत म्हणजे, कंपनी याला अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन सपोर्टसोबत बाजारात आणणार आहे. या इअरबड्समध्ये उत्तम साउंड क्वॉलिटीसोबत टच आणि जेस्चर कंट्रोलही मिळेल. असं सांगण्यात येत आहे की, यामध्ये 30 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप मिळू शकते. याची किंमत पाच हजार रुपये असू शकते.