मक्का, मदिना पवित्र स्थळी प्रथमच महिला गार्ड तैनात

युएईच्या क्राऊन प्रिन्सने सौदी मध्ये महिलांना अधिक स्वातंत्र देण्यासाठी अनेक सुधारणा करणारे व्हिजन २०३० अभियान सुरु केल्याचा परिणाम म्हणून या वर्षी प्रथमच मक्का मदिना या मुस्लीम समाजाच्या पवित्र यात्रा स्थळांवर महिला गार्ड्स नियुक्ती केली गेली आहे. सौदी मध्ये महिलांना खुपच कमी स्वातंत्र असल्याची ओरड जगभरातील देश नेहमीच करत होते.

मक्का, मदिना या पवित्र स्थळी हज यात्रेनिमित्त दरवर्षी देशविदेशातून लाखोंनी मुस्लीम भाविक येतात. यंदा प्रथमच मक्का मदिना मशिदीतील सुरक्षा आणि यात्रेकरूंची सुरक्षा व देखभाल करण्याची जबाबदारी महिला गार्ड्सवर सोपविली गेली आहे. मोना ही अशी पहिली गार्ड बनली आहे. मोना सांगते, वडिलांकडून प्रेरणा घेऊन तिने देशाच्या सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. सौदी वूमन सोल्जर ग्रुपमध्ये मोना काम करते. एप्रिल पासून आत्तापर्यंत मक्का मदिना येथे डझनावारी महिला गार्ड नियुक्त केल्या गेल्या आहेत.

या सर्व महिला गार्ड मिलिटरी ड्रेस मध्ये आहेत आणि शिफ्ट मध्ये काम करत आहेत. मुख्य मशिदीची सुरक्षा सुद्धा या महिलांना दिली गेली आहे.