इन्फिनिक्स झिरो ८ आय, मस्त फिचर्सचा बजेट स्मार्टफोन

इन्फिनिक्सने १६ हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत मस्त फिचर्स देणारा एक खास स्मार्टफोन इन्फिनिक्स झिरो आय नावाने बाजारात आणला आहे. या फोनची खासियत म्हणजे याला ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि सेल्फीप्रेमींसाठी दोन सेल्फी फ्रंट कॅमेरे दिले आहेत. या फोनची किंमत १५९९९ रुपये असून फ्लिपकार्डवरून तो खरेदी करता येणार आहे. १५ ते १६ हजार रेंज मध्ये आज बाजारात अनेक चांगले स्मार्टफोन उपलब्ध असले तरी त्यातील एकालाही ८ जीबी रॅम आणि दोन सेल्फी कॅमेरे दिले गेलेले नाहीत. म्हणून इन्फिनिक्सचा हा नवा फोन वेगळा ठरला आहे.

अन्य फिचर्स मध्ये ६.८५ इंची फुल एचडी, एलसीडी आयपीएस इन सेल डिस्प्ले दिला गेला आहे. रियलला क्वाड कॅमेरा सेटअप असून त्यात ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा शिवाय ८ एमपी, २ एमपीचे दोन कॅमेरे आणि एआय लेन्स दिले गेले आहे. फ्रंट कॅमेरे १६ आणि ८ एमपीचे आहेत. फोनला ४५०० एमएएचची ३३ वॉट फास्ट चार्जिंग बॅटरी दिली गेली आहे.