राज कुंद्राकडे पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी तयार होता ‘प्लॅन बी’


पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून अटकेपूर्वी राज कुंद्राची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी पॉर्न चित्रपट आणि पॉर्न अॅप प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. राज कुंद्राला आधीच पॉर्न बंद केले जाईल याची पूर्व कल्पना आली होती, असे या चौकशीतून समोर आले असून, त्यासाठी त्याने पूर्ण तयारीही केली होती. त्याचबरोबर त्याने यासाठी ‘प्लॅन ‘बी’देखील तयार होता. राज कुंद्राचे व्हॉट्सअॅप चॅट अटकेनंतर समोर आले असून, या चॅटमध्ये राज कुंद्रा रॅकेटमधील सहकाऱ्यांशी प्लॅन बी बद्दल बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुगल प्ले मुळे त्याचे ‘हॉटशॉट’ हे अॅप गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी सस्पेंड करण्यात आले होते. राज कुंद्राला असे काही होईल याची कल्पना आधीच होती आणि त्यामुळे त्याने प्लॅन बी तयार केला होता. या सगळ्याची चर्चा ही हॉट्सअॅपवर असलेल्या ‘एच’ नावाच्या ग्रुपवर झाली होती. प्रदीप बक्षीने एक पीडीए फाईल शेअर केली होती, ज्यात ‘हॉटशॉट’ अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्याचा उल्लेख होता. तेव्हा राज कुंद्रा म्हणाला होता की, काही हरकत नाही, प्लॅन बी सुरु झाला आहे. नवीन अॅप जास्तीत जास्त २ ते ३ आठवड्यांमध्ये सुरु होईल. बोलिफेम असे ‘बी’ प्लॅनचे खरे नाव आहे. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेने नेता यावे, यासाठी राज कुंद्राने हा प्लॅन तयार केला होता. राज कुंद्रा आणि बक्षीतील हे चॅट पोलिसांना कामतच्या फोनमधून मिळाले आहेत. कामतला फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती.