बंदी असूनही भारतात वेगाने होतोय पोर्न बाजारचा विकास

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनविल्या प्रकरणी मुंबई गुन्हा अन्वेषण विभाग पोलिसांनी अटक करून रिमांड घेतल्यामुळे पुन्हा एकदा भारतातील पोर्न बाजारावर चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक भारतात पोर्न उद्योगावर कायद्याने बंदी आहे. पोर्न साठी फेमस असलेल्या अनेक पोर्न साईट्स त्यामुळे भारतात ओपन होत नाहीत तरीही अमेरिकेप्रमाणेच भारतात पोर्न इंडस्ट्री वेगाने विकसीत होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अनेक बडे बडे उद्योजक यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत असे समजते.

पोर्न व्ह्यूअरशिप मध्ये राजधानी दिल्ली नंबर एक वर असून येथे सर्वाधिक म्हणजे ३९ टक्के पोर्न ट्राफिक आहे. २०१८ मध्ये या संदर्भातील एक रिपोर्ट प्रोनहब या संस्थेने दिला होता. त्यानुसार भारतीय युजर्स सरासरी ८ मिनिटे आणि २३ सेकंड पोर्न साईट्स पाहतात. दिल्ली मध्ये ही सरासरी ९ मि. २५ सेकंद तर जागतिक सरासरी १० मि. १३ सेकंड अशी आहे. युजर्स कडून भारतात पोर्नला बंदी असल्याने खास कीवर्ड वापरले जातात. त्यात इंडियन भाभी आणि देवर, देशी, वाईफ हसबंड, इंडियन कॉलेज, इंडियन टीचर वुईथ हिंदी या कीवर्डचा समावेश आहे. या की वर्ड वरून पोर्न मार्केटचा अंदाज केला जातो.

विशेष म्हणजे खास टेक्निक वापरून बंदी असलेल्या साईट्स पाहता येतात. भारतात टेलिकॉम कंपन्यांनी पोर्न साईट्स बॅन केल्या असल्या तर युजर्स मिरर डोमेन म्हणजे युआरएल बदल करून अश्या साईट सर्रास पाहतात असे पाहणीत दिसून आले आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात भारतात पोर्न साईट ट्राफिक मध्ये ९५ टक्के वाढ झाली होती असेही दिसून आले आहे.