राज कुन्द्राने पत्नी शिल्पाला दिल्यात अश्या महागड्या गिफ्ट्स

व्यावसायिक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर बॉलीवूड मधील प्रसिद्ध असे हे जोडपे पुन्हा चर्चेत आले आहे. शिल्पा शेट्टी आणि राज यांचा विवाह २२ नोव्हेंबर २००९ मध्ये झाला आणि हे दोघे मिळून अनेक व्यवसाय करतात. कोट्यवधी किमतीची मालमत्ता यांच्याकडे आहे. राज याने शिल्पाला दिलेल्या महागड्या गिफ्ट्सच्या किमती ऐकून सर्वसामान्य माणसाचे डोके चक्रावून जाईल यात काही शंका नाही.

राज याने शिल्पाला साखरपुड्याची दिलेली अंगठीच सुमारे ४ कोटींची होती. २० कॅरेटचा हिरा जडविलेली ही अंगठी शिल्पाच्या बोटात नेहमी दिसते. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज याने शिल्पाला जगातील सर्वात उंच, प्रतिष्ठित, दुबई येथील बुर्ज खलीफा इमारतीत १९ व्या मजल्यावर ५० कोटी रुपये किमतीचे अपार्टमेंट गिफ्ट केले होते. शिल्पाने नंतर ते विकून टाकले होते.

मुंबईत एक सी फेसिंग व्हिला असावा अशी इच्छा शिल्पाने व्यक्त केल्याबरोबर राज याने किनारा नावाचा सी फेसिंग व्हिला शिल्पासाठी खरेदी केला आणि तेथेच सध्या ते राहतात. या व्हिलाची किंमत कोट्यवधी आहे. शिवाय युके मध्ये त्याने शिल्पासाठी सात बेडरूमचे अलिशान घर घेतले असून सुट्टीच्या काळात त्यांचा मुक्काम येथे असतो. शिल्पाला अनेक महागड्या कार्स राज याने भेट दिल्या असून त्यात बीएमडब्ल्यू झेड ४ चाही समावेश आहे.