व्हॉट्सअ‍ॅपचे ‘जॉईनेबल ग्रुप कॉल’ फिचर लाँच


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपवरच्या ग्रुप कॉल या फिचरचा फायदा झाला आहे. कारण रोजच्या वापरातील अ‍ॅपमध्येच कॉल करण्याची सोय असल्यामुळे पटकन आणि सोप्या पद्धतीने कॉल करता येतात. याचदरम्यान आता वापरकर्त्यांसाठी कोणत्याही कॉलमध्ये सामील होण्यास सोप्प व्हावे म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने ‘जॉईनेबल ग्रुप कॉल’ हे नवीन फीचर लाँच केले आहे. व्हॉट्सअॅपने या फिचरची सोमवारी घोषणा केली. व्हॉट्सअ‍ॅपवर कॉलमधून तुम्ही लेफ्ट झाल्यावर पुन्हा स्वतःहून जॉईन होता येत नव्हते. तसेच तुम्हाला कॉलमध्ये काही वेळाने जॉईन व्हायचे असेल, तर तेही शक्य नव्हते. हे फिचर या अडचणी दूर करणारे आहे. पण यासाठी तुम्हाला अ‍ॅप अपडेट करणे गरजेचे आहे.

वापरकर्त्यांला जॉईनेबल ग्रुप कॉलमुळे ग्रुप कॉल सुरु झाल्यावर काही मिनिटांनंतरही ग्रुप कॉलमध्ये सामील होणे शक्य आहे. यामुळे आपला कोणताही कॉल चुकणार नाही. कॉल आलेल्या वेळी आपण काहीही कारणामुळे व्यस्त असल्यास कॉलमध्ये कालांतराने सामील होऊ शकता. तुम्हाला हवे तेव्हा कॉलमधून बाहेरही पडू शकता आणि पुन्हा जॉईनही करु शकता.

व्हॉट्सअॅपने या नवीन फीचरची घोषणा करताना एका निवेदनात म्हटले आहे की, आपण जेव्हा एकमेकांनापासून लांब असतो तेव्हा मित्र व कुटूंबासमवेत ग्रुप कॉलवर एकत्र येण्यापेक्षा चांगले काय असेल. आपण असा एखादा खास क्षण मिस करू नये म्हणून आम्ही हे नवीन फिचर आणले आहे. ग्रुप कॉलची लोकप्रियता जसजशी वाढत आहे तसतसे आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी त्यात अजून बदल करायचा, अपडेट करायचा प्रयत्न करत आहोत. अर्थातच यातही एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुरक्षा आणि गोपनीयता आहेच.

हे फिचर तुम्हाला वापरायचे झाल्यास जेव्हा तुम्हाला कोणी ग्रुप कॉलमध्ये सामील करेल तेव्हा तुम्हाला प्रथम अ‍ॅपकडून सूचना येईल. तुम्ही त्या कॉलमध्ये तात्काळ सामील होण्यास इच्छित नसल्यास ‘इगनोर’ या ऑप्शनवर टॅप करू शकता. परंतु तुम्हाला कॉलमध्ये सहभागी व्हायचे असल्यास नेहमीप्रमाणे कॉल घ्या. तुम्ही कॉल मेनूमधून कॉलमध्ये सामील होण्यासाठी अद्याप सहभागी न झालेल्या लोकांची संख्या तपासू शकता. कॉलमध्ये नंतर सामील होण्यासाठी ‘जॉईन’ वर टॅप करा आणि तुम्हाला चॅट विंडोमध्ये पर्याय दिसेल. तुम्ही कॉलवर असताना ‘ओपन कॉल इन्फो स्क्रीन’ हे उघडून अॅड मोर वर टॅप करा. अशाप्रकारे तुम्ही कॉलमध्ये अधिक लोकांना जोडू शकता.